सिल्लोड, (प्रतिनिधी) : सहकार महर्षी, माजी मंत्री स्व. माणिकराव (दादासाहेब) पालोदकर यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील सहकार महर्षी तथा माजी मंत्री स्व. माणिकराव (दादासाहेब) पालोदकर मार्ग येथे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते स्व. माणिकराव पालोदकर मार्गावरील नामफलकास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम दरम्यान उपस्थित मान्यवरांनीही दादासाहेब पालोदकर यांच्या केले. प्रतिमेस अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी स्व. दादासाहेब पालोदकर यांनी सहकार, सामाजिक व जनहिताच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व सहकार क्षेत्रासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
समाजहिताची जपलेली बांधिलकी आणि लोकांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध यामुळे माणिकराव पालोदकर यांनी जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले, असेही त्यांनी नमूद या अभिवादन कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, माजी सभापती रामदास पालोदकर, कृष्णा पालोदकर, मुकेश पालोदकर, निखिल पालोदकर, विनोद मंडलेचा, संजय डमाळे, अनिल पालोदे, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर, शेख सलीम हुसेन, प्रफुल्ल हुरणे, रवी गायकवाड, सखाराम आहिरे, ऋतुराज चव्हाण, शिवा टोम्पे, प्रशांत जोशी, संदीप हाडोळे, जगन्नाथ कुदळ, राजू सुरडकर, गौरव सहारे, फईम पठाण, कृष्णा वाघ, दिलीप वाघ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









